। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेवरील नेरळ रेल्वे स्थानकात येणारे पर्यटक प्रवासी यांच्यामुळे या स्थानकाला महत्व आहे. या स्थानकाचे महत्व लक्षात घेऊन या स्थानकात नव्याने रंगरंगोटी करण्याचे काम मध्य रेल्वे प्रशासनाने हाती घेतले आहे. नेरळ स्थानकातील पादचारी पुल व निवारा शेडच्या उद्घाटनाच्या निमित्ताने रेल्वेचे अधिकारी नेरळ येथे येणार आहेत. त्यासाठी नेरळ स्थानकाला नवीन रुपडे आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाच्या या कामाबद्दल प्रवासी खुश असून रेल्वेचे अधिकारी हे दरवर्षी कर्जत-नेरळ भागात यायला हवेत, अशी सूचनादेखील प्रवासी करीत आहेत.