ईद-ए-मिलादुन्नबी सुधागडात साजरी

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
मुस्लिम बांधवांच्या अत्यंत पवित्र समजला जाणारा ईद-ए-मिलादुन्नबी संपूर्ण देशात रविवारी ( दि. 9) सुधागड-पाली साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ईद-ए-मिलादुन्नबी सणानिमित्त पाली सुधागड येथील खालचा मुल्ला ते गांधी चौक मार्गे नुरानी जामा मास्जिद पाली या मार्गे मिरवणूक काढण्यात आली. जुलूसमध्ये आबालवृद्ध सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या मार्गावर आकर्षक सजावटसह विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जुलुसमध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले. डोक्यावर इस्लामी टोपी परिधान करत अनेक मुस्लिम बांधव जुलूसमध्ये सहभागी झाले होते. नात-ए-पाकचे वाचन करण्यात आले. रविवारी पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली.

Exit mobile version