| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
हिमाचल प्रदेशातील सिरमौर येथे शुक्रवारी एक मोठा रस्ता अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस दरीत कोसळली. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये 35 पेक्षा अधिक प्रवासी होते, त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. ही खासगी बस शिमलाहून कुपवीला जात होती. सिरमौर जिल्ह्यातील हरिपूरधारजवळ ही बस दरीत कोसळली. बसमध्ये गर्दी होती, त्यामुळे अपघात घडताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आरडाओरड झाली. या भीषण अपघाताची माहिती मिळाताच स्थानिकांनी बसकडे धाव घेतली आणि बसमधील प्रवाशांना बाहेर काढणे सुरू केले. दरम्यान, जखमींना तातडीने स्थानिक रूग्णालयात हलवण्यात आले आहे. तर अनेकाची परिस्थिती गंभीर असल्याचीही माहिती समोर आली आहे. या बसमध्ये 30-35 प्रवासी होते.






