पेणमध्ये आठ मतदान केंद्र

| पेण | प्रतिनिधी |

26 जून रोजी होऊ घातलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे मतदान होत असून, पेण तालुक्यात एकूण आठ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यामध्ये तीन मतदान केंद्र हे सार्वजनिक विद्या मंदिर पेण येथे असून, 56 नंबरचे मतदान केंद्र हे खोली नं. 9 मध्ये, 57 नंबरचे मतदान केंद्र हे खोली नं. 16 मध्ये, तर 58 नंबरचे मतदान केंद्र हे खोली नं. 17 मध्ये असणार आहे. तर, श्रीमती सुमतीबाई वि.देव प्राथमिक विद्या मंदिर येथे 56अ तळमजला खोली नं. 112, 57अ तळमजला खोली नं. 113, 57ब तळमजला खोली नं. 117, 58अ तळमजला खोली नं. 103, 58ब तळमजला खोली नं.116 अशी एकूण आठ मतदान केंद्रे आहेत. बुधवार, दि. 26 जून रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

Exit mobile version