सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
| सुकेळी | वार्ताहर |
वाकण-पाली महामार्गावर पाली येथे बिसलरी घेऊन जाणार्या आयसर टेम्पो चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटल्याने गाडी साईडपट्टीवरुन खाली उतरल्यामुळे अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात शुक्रवार (दि.16) रोजी पहाटे घडला.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, वाकण बाजूकडून पालीच्या दिशेकडे बिसलरीच्या बॉटल घेऊन जाणारा आयसर टेम्पो क्र. एम.एच.06 बी डब्ल्यू 4894 ही गाडी जंगलीपीरच्या समोर आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी साईडपट्टीवरुन घसरुन बाजूला असलेल्या छोट्या नाल्यामध्ये अर्धवट स्थितीत पलटी झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे टेम्पोत बाजूला करण्यासाठी अडथळा येत होता; परंतु पाऊस कमी झाल्यानंतर काही तासाने क्रेनच्या मदतीने हा टेम्पो बाजूला करण्यात आला.