बंडखोर एकनाथ शिंदेंकडून आसामला ५१ लाखांची मदत जाहीर

। मुंबई । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्रातील राजकारणात उतळाफुतळ सुरू असतानाच दुसरीकडे राज्याला पुराचा फटका बसला असल्याने मोठं संकट निर्माण झालं आहे. आसाममधील २१ लाख नागरिक अद्याप पुरात अडकले आहेत. पुरामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १३४ वर पोहोचली आहे. त्यामुळे बंडाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये आसामच्या पुराचाही उल्लेख होत आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांनी आसामसाठी ५१ लाखांची मदत जाहीर केली आहे.

एकनाथ शिंदेंचं ट्वीट
आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसंच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत दिली आहे.

Exit mobile version