| पनवेल | वार्ताहर |
एका 65 वर्षीय वृद्धाची फसवणूक करून सोन्याची चैन पळवून नेल्याची घटना पनवेल बस स्टॅन्ड परिसरात घडली आहे. चंद्रशेखर सावंत यांनी कळंबोली येथे जाऊन परत पनवेल बस स्टॅन्डला यायचे असल्याचे सांगून सदर भाड्याचे पैसे देतो असे सांगून एका इको गाडीत नेले. सदर चालकाने सावंत यांना त्यांच्या न कळत त्यांना चहामध्ये गुंगीकारक औषध देऊन त्यांच्या गळ्यातील 50 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन ज्याची किंमत जवळपास 2,50,000/- रुपये इतकी आहे. ती चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







