। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूरमध्ये भरधाव कारने दिलेल्या धडकेत 61 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राणाप्रताप नगर चौक परिसरातील राधेमंगलम चौकात रात्रीच्या वेळी हा भीषण अपघात घडला. भाग्यश्री कोठीवान असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास भाग्यश्री कोठीवान या पायी जात असताना एका भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना धडक दिली. कारची गती इतकी प्रचंड होती की धडक बसताच भाग्यश्री कोठीवान या काही फूट दूर फेकल्या गेल्या आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटलेली कार रस्त्यालगतच्या एका विजेच्या खांबाला जोरदार धडकली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अपघातग्रस्त कारच्या चालकाला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
भरधाव कारच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू
