वृद्ध महिला बेपत्ता

| पनवेल | वार्ताहर |

80 वर्षीय सुंदरी काशिनाथ पाटील ही महिला घरातून बाहेर गेली असता, ती परत न आल्याने तिची हरवल्याची तक्रार खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांचा रंग सावळा, केस पांढरे आहेत. त्यांची उंची पाच फूट दोन इंच असून, अंगात निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसलेली होती. गालावर डाव्या बाजूला काळ्या रंगाची जन्मखूण असून त्यांना मराठी भाषा बोलता येते. या महिलेबाबत अधिक माहिती असल्यास पोलीस हवालदार उदय देसाई यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन खांदेश्‍वर पोलिसांनी केले आहे.

Exit mobile version