। पनवेल । प्रतिनिधी ।
पायी चालत जात असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून दोघेजण मोटरसायकलवरून पसार झाले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रेयसी कर्वे (67) या विघ्नेश मेडिकलसमोर स्वामी नित्यानंद मार्ग, पनवेल येथून पायी चालत जात होत्या. यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून पळून गेले.







