| रेवदंडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील कोर्लई व काकळघर ग्रामपंचायत निवडणूक 18 डिसेंबर रोजी होत असून, दोन्हीकडे निवडणूक प्रचाराचा जोरदार धडाका सुरू झाला आहे.
काकळघर ग्रामपंचायतीत सरपंचासाठी थेट निवडणूकीत सर्वसाधारणसाठी राखीव असून, किसन किंजले, स्वस्तिक ठाकूर, मोहीनेश ठाकूर यांच्यामध्ये तिरंगी लढत आहे, तर प्रभाग एकमध्ये हर्षला आग्री, निशा तेरेकर, मंगेश कुलवे, सुदेश पाडावे, मरेश बडवे, मनोहर मेहत्तर, मयूर ठाकूर तसेच प्रभाग दोनमध्ये मंगेश जोगत, निशांत दांडेकर, काळी ठाकूर, सुरक्षा ठाकूर, निलम ठाकूर, पुप्षा मेहत्तर व प्रभाग तीनमध्ये गोंविद ठाकूर, उषा ठाकूर, रसिका थळे, संपदा कांबळी, पल्लवी रामचंद्र भोईर व रूपाली महाडिक हे निवडणूक लढवित आहेत.
कोर्लई ग्रामपंचायतीत सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत नाममात्र महिला उमेदवारासाठी राखीव असून, दिपाली म्हात्रे, राजश्री मिसाळ, अलका पाटील व नेत्रा भोय यांच्यात चौरंगी लढत होत आहे. तर प्रभाग एकमधून वेरोनिका डायगो मार्तिस, रेश्मा मिसाळ, गोविंद वाघमारे, उपेंद्र बलकवडे, रूझारियो कैतान, दिलीप वाघमारे, दयानंद पाटील व प्रभाग दोनमध्ये प्रशांत मिसाळ, जयेश म्हात्रे, कविता सतविडकर, यशोधा वाघमारे, सारिका वाघमारे, रंजना बलकवडे व प्रभाग तीनमध्ये जितेंद्र पाटील, जयश्री पाटील, योगेश पाटील, लतिका बलकवडे, अनंता पाटील, यशोधा वाघमारे, जना वाघमारे, जागृती पिटकूर हे निवडणूक लढवित आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून सचिन मुनेश्वर हे काम पहात आहेत.