| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी बुधवार, दि. 1 जुलै रोजी दुपारी 1 वाजता या पदासाठी मतदान होणार आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम सोमवारी विधान परिषदेत जाहीर केला. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपल्याने हे पद रिक्त झाले आहे. विधान परिषदेत सध्या भाजपची सदस्यसंख्या सर्वाधिक आहे. मात्र, महायुतीमधील सत्तावाटपाच्या ठरलेल्या सूत्रानुसार उपसभापतीपद पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडेच जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरलं आहे. उपसभापती पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून ठाकरेंचे आमदार सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
उपसभापतीपदासाठी उद्या निवडणूक
