निवडणूक निरीक्षकाची जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट

| रायगड | प्रतिनिधी |

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मावळ मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) बुदिती राजशेखर यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत 31 मावळ लोकसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरु असलेल्या पूर्वतयारी बाबत चर्चा केली. तसेच, त्यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.

मावळ लोकसभा मतदारसंघात उरण, पनवेल, कर्जत विधानसभा क्षेत्रातील भाग असून मतदारसंघाशी संबंधित कामकाज सुरू आहे. निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर यांनी जिल्हा निवडणूक आचारसंहिता कक्ष, निवडणूक सनियंत्रण कक्ष, मीडिया सेल आदींची पाहणी केली. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच, माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल, समाज माध्यमद्वारे प्रसिद्धी, इलेक्ट्रॉनिक मीडिया, जिल्हा माध्यम कक्षातून प्रसार माध्यमे व वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे. यावेळी राजशेखर यांनी जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाबद्दल माहिती घेतली. निवडणुकीची मतदान जागृतीसाठी स्विपसह विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीची माहिती माध्यम कक्ष प्रमुख मनीषा पिंगळे यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते.

Exit mobile version