कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक दि. 3 ते 30 यादरम्यात होणार आहे. एकूण 18 जागांसाठी ही निवडणूक होणार असून, यामध्ये बहुउद्देशी सहकारी संस्था एकूण 11 सदस्य, सर्वसाधारण 7, महिला 2, इतर मागासवर्ग 1, विमुक्त जाती जमाती (भटक्या) 1, ग्रामपंचायत प्रतिनिधीमधून 4 यामध्ये सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती जमाती 1, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 1, व्यापारी व अडते प्रतिनिधी 2, हमाल व तोलारी प्रतिनिधी 1 असे एकूण 18 प्रतिनिधी असून, दि. 27 मार्च ते 3 एप्रिलदरम्यान उमेदवारी अर्ज भरायचा आहे.

उमेदवारी अर्जाची छाननी दि. 5 सकाळी 11 वाजता निवडणूक कार्यालयात होईल. दि. 6 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. तसेच दि. 11 ते 3 च्या दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल. अंतिम यादी प्रसिद्धी दि. 21 रोजी करण्यात येईल. निशाणीचे वाटपदेखील त्याच दिवशी करण्यात येईल. मतदान दि. 30 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत घेण्यात येईल. दरम्यान, मतमोजणी त्याच दिवशी संध्याकाळी करण्यात येईल, असे डॉ. पी.एल. खडांगळे यांनी जाहीर केले आहे.

Exit mobile version