स्थायी समितीच्या सभापतींची निवड बिनविरोध

| तळा | वार्ताहर |

तळा शहराचे नियोजन आणि प्रशासनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तळा नगरपंचायतीच्या विविध विषय समितींच्या सभापतींची निवडणूक तळा नगरपंचातीमध्ये पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पेण प्रवीण पवार यांच्या अधिपत्याखाली पार पडली. यावेळेस सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम व दिवाबत्ती समितीपदी चंद्रकांत रोडे, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व शिक्षण समितीपदी अस्मिता भोरावकर, महीला बालकल्याण, क्रीडा व सांस्कृतिक समितीपदी नेहा पांढरकामे, पर्यटन विकास व नियोजन समितीपदी अविनाश पिसाळ, पाणी पुरवठा व जलःनिसारण समितीपदी मंगेश शिगवण, महिला बालकल्याण क्रीडा महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 63 (2ब) मधील तरतुदीनुसार अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिध्द सभापती असल्याने नगराध्यक्षा माधुरी घोलप यांची सभापती निवड झाली आहे. तळा नगरपंचातीमध्ये निवड प्रक्रिया पीठासीन अधिकारी प्रवीण पवार यांनी सुव्यवस्थित व शांततेत पार पाडली. त्यांना मुख्याधिकारी विराज लबडे यांनी सहकार्य केले. सर्वांच्या सहकार्याबद्दल प्रवीण पवार यांनी आभार मानले.

Exit mobile version