पोलादपूर तालुक्यातील चार ग्रा.पं.चे मतदान

| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकींची रणधुमाळी पहिल्या टप्प्यातील चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीने सुरू होत आहे. दुसर्‍या टप्प्यातील 16 ग्रामपंचायतींसाठी मतदार प्रारूप यादी प्रसिध्द करून प्रक्रिया सुरू झाली आहे.

तुर्भे खोंडा सरपंचांची थेट लढत
तुर्भे खोंडा येथे सरपंच पदासाठी कविता केशव खेडेकर विरूध्द प्रमिला प्रमोद महाडीक अशी थेट लढत होणार असून या ग्रामपंचायतीमधील दीपक खेडेकर, चैताली गोळे, अश्‍विनी जाधव, निर्मला देवळेकर, रामचंद्र खेडेकर, अनिता गायकवाड, गोपाळ खेडेकर हे 7 सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

वझरवाडी- 16 उमेदवार
वझरवाडीमध्ये सरपंच पदाच्या थेट लढतीमध्ये संभाजी जाधव विरूध्द श्रीहास शिंदे असा सामना असून प्रभाग 1 मध्ये सर्वसाधारण जागेसाठी कृष्णा जाधव विरूध्द केशव शिंदे, सर्वसाधारण स्त्री या दोन जागांसाठी रेश्मा उतेकर, अश्‍विनी चव्हाण, मेघा जाधव, वंदना जाधव यांच्यामध्ये लढत आहे.

तुर्भे बुद्रुक-9 रिंगणात
तुर्भे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग 1 मध्ये राजेश साळवी हे अनुसुचित जातीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले असून प्रभाग 2 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गात हेमंत गोळे व सर्वसाधारण स्त्री प्रवर्गामध्ये मंगल गोळे हे तीन उमेदवार बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे येथे सरपंच पदासाठी सुरेखा गोळे विरूध्द निशा शेलार यांच्यात थेट लढत असून प्रभाग 1 मध्ये सर्वसाधारण स्त्री या एका जागेसाठी किरण गोळे, पूजा गोळे आणि संचिता गोळे या भवितव्य आजमावित आहेत.

उमेदवारांचे भवितव्य
पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द येथे 16 उमेदवार रिंगणात असले तरी येथील मतदार संख्या या चारही ग्रामपंचायतीमधील सर्वाधिक आहे. थेट सरपंच पदासाठी एकूण 411 महिला तर 411 पुरूष असे 822 मतदार हक्क बजाविणार आहेत. सर्वसाधारण सरपंचपदासाठी गोविंद उतेकर विरूध्द तुकाराम उतेकर अशी लढत होणार आहे.

Exit mobile version