खो-खो असोसिएशनची निवडणूक बिनविरोध

। पुणे । प्रतिनिधी ।

महारराष्ट्र खो-खो असोसिएशनची निवडणूक रविवारी (दि.7) 2024 ते 2028 या कालावधी करता जाहीर झाली होती. ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत भारतीय खो-खो महासंघाचे निरीक्षक म्हणून इंदोरचे नितिन कोठारी उपस्थित होते.

यावेळ, अध्यक्षपदी- संजीवराजे नाईक निंबाळकर (सातारा), उपाध्यक्षपदी- डॉ. जितेंद्र आव्हाड (ठाणे), अनिकेत तटकरे (रायगड), महेश गादेकर (सोलापूर), अशोक पितळे (अहमदनगर), कार्याध्यक्षपदी- सचिन गोडबोले (पुणे), सरचिटणीसपदी- डॉ. चंद्रजीत जाधव (धाराशिव), संयुक्त चिटणीसपदी- डॉ. राजेश सोनवणे (नंदुरबार), डॉ. पवन पाटील (परभणी), जयांशू पोळ (जळगाव), बाळासाहेब (बाळ) तोरसकर (मुंबई), वर्षा कच्छवा (बीड), खजिनदारपदी- अ‍ॅड. गोविंद शर्मा (औरंगाबाद) यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली.निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन माननीय संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले, तर चंद्रजीत जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली.

Exit mobile version