सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी प्रणाली पाटील
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती निवडीसाठी पाली तहसील कार्यालयात हिरकणी कक्षात विशेष सभा संपन्न झाली. या समित्यांची सभापती निवड ही बिनविरोध झाली आहे.
यामध्ये सार्वजनिक बांधकाम समिती सभापती पदी प्रणाली पाटील, स्वच्छ्ता व वैधक सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी विनायक जाधव, पाणी पुरवठा व जलनिसरण समिती सभापतीपदी सुलतान बेनसेकर, महिला व बाल कल्याण, पर्यटन समिती सभापतीपदी नलिनी म्हात्रे यांची निवड झाली आहे. तर नियोजन, विकास, क्रीडा, सांस्कृतिक व दिवाबत्ती समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष आरिफ गफुर मणियार यांची निवड झाली आहे.
राष्ट्रवादी व शेकाप आघाडीकडून पाच अर्ज भरले होते ते सर्व वैध ठरले. तसेच प्रतिस्पर्धी नसल्याने सर्व सभापती निवड बिनविरोध झाल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. माने यांनी जाहीर केले. प्रत्येक समितीसाठी एकमेव अर्ज आल्याने निवडी बिनविरोध झाल्या.
सभापती निवडीचे काम उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने व मुख्य कार्यकारी अधिकारी अंगाई साळुंखे यांनी पाहिले. यावेळी नगराध्यक्षा गीता पालरेचा, माजी आमदार धैर्यशील पाटील, जि. प. सदस्य सुरेश खैरे, उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, रमेश साळुंखे, संदीप दपके, संजोग शेठ, नगरसेवक व नगरसेविका, स्वीकृत नगरसेवक तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
सभापती व समिती सदस्य
सार्वजनिक बांधकाम समिती – सभापती – प्रणाली निशिकांत पाटील, सदस्य – गणेश सावंत, प्रितिजा जोशी, पराग मेहता, सचिन जवके.
स्वच्छ्ता व वैधक सार्वजनिक आरोग्य समिती – सभापती- विनायक विठ्ठल जाधव, सदस्य – सुधीर भालेराव, मधुरा टाकळेकर, सुधाकर मोरे ,प्रतीक्षा पालांडे.
पाणी पुरवठा व जलनिसरण समिती- सभापती – सुलतान बेनसेकर, सदस्य – आशिक मणियार, सुधीर भालेराव, सुमेध खैरे, कल्याणी दपके.
महिला व बाल कल्याण, पर्यटन समिती- सभापती- नलिनी गणेश म्हात्रे, उपसभापती – मधुरा टाकळेकर, सदस्य – जुईली ठोंबरे, आशिक मणियार, प्रितीजा जोशी.
नियोजन, विकास, क्रीडा, सांस्कृतिक व दिवाबत्ती समिती – सभापती- उपनगराध्यक्ष आरिफ मणियार, सदस्य – सुधीर भालेराव, पराग मेहता, दीप्ती पारधी, आशिक मणियार.







