अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोकण मराठी साहित्य परिषद, मुरुड-जंजिरा शाखेची सर्वसाधारण सभा दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सदर सभेमध्ये २०२१ ते २०२४ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. शाखाध्यक्षपदी श्री. संजय गुंजाळ, उपाध्यक्ष सौ. उषा खोत,कार्याध्यक्ष श्री. अरुण बागडे, सचिव सौ. नैनिता कर्णिक, सह-सचिव प्रतिभा मोहिले,खजिनदार श्रीमती प्रतिभा जोशी, उप-खजिनदार सौ उर्मिला नामजोशी, जिल्हा प्रतिनिधी श्री. सिद्धेश लखमदे, युवाशक्ती प्रमुख आशिष पाटील यांची सर्वानुमते निवड झाली.
सर्व नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पुष्पगुछ देऊन अभिनंदन करण्यात आले. नवीन कार्यकारिणीच्या उपस्थितीत दिनांक २७ फेब्रुवारी रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सदर सभा मुरुड जंजिरा नगरपरिषद शाळा क्रमांक ४ येथील सभागृहात पार पडली. सचिव नैनिता कर्णिक यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन करून सभा संपल्याचे जाहीर केले.