| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची विशेष सभा बुधवारी (दि.8) पी.एन.पी. माध्यमिक शाळा मोठी जुई येथे येथे पार पडली. या सभेच्या अध्यक्षपदी सुधीर मुंबईकर हे होते. या सभेसाठी संघाचे संस्थापक अध्यक्ष नाथा नाईक, अरुण घाग, सूरदास राऊत, किशोर भोईर, संतोष म्हात्रे, प्रवीण पाटील, मिलिंद पट्टेबहादूर, मनोज म्हात्रे, सोनाली कोळी इत्यादी सदस्य उपस्थित होते. या सभेत संघाची नवीन कार्यकारिणी नेमण्यात आली. अध्यक्ष म्हणून मिलिंद पट्टेबहादूर, उपाध्यक्ष सोनाली कोळी, सचिवपदी संतोष म्हात्रे आणि खजिनदार म्हणून प्रवीण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला पी.एन.पी. शाळेचे मुख्याध्यापक किशोर भोईर यांनी सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यांनी प्रास्ताविकात संघाची स्थापनेपासूनची वाटचाल विशद केली. याप्रसंगी सर्व सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.




