| पनवेल | वार्ताहर |
महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनच्या नवी मुंबई कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत मावळते अध्यक्ष आनंद पाटील यांनी शंकर म्हात्रे यांना अध्यक्षपदाचा पदभार दिला, तर मावळते महासचिव हितेश सावंत यांनी तुकाराम दुधे यांना महासचिव पदाचा पदभार दिला. याचप्रमाणे मावळते खजिनदार महेश माटे यांनी बाळासाहेब देशमुख यांना खजिनदारपदाचा पदभार दिला. या नवीन कार्यकारिणीस अध्यक्ष व कमिटी यांनी शुभेच्छा दिल्या.







