। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
निवडणूक सुधारणा विधेयक सोमवारी लोकसभेमध्ये मोठ्या गोंधळात मंजूर झालं. याला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला. मात्र, तृणमूल काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला. या विधेयकामुळं निवडणूक प्रक्रियेत सकारात्मक बदल घडून येईल असं सांगितलं जातंय तर विरोधकांनी मात्र हा प्रकार नागरिकत्वाशी संबंधीत होऊ शकत नाही, असं म्हटलंय.
निवडणूक सुधारणा विधेयक 2021 मध्ये मतदान कार्ड आधार कार्डशी जोडण्यात येणार आहे. यामुळं मतदान यादीतील दुबार नावं आणि बोगस मतदान रोखण्यासाठी याचा फायदा होणार आहे. याच कारणामुळं विरोधीपक्षांपैकी एक असलेल्या तृणमूल काँग्रेसनं या विधेयकाला पाठिंबा दर्शवला आहे.
काँग्रेसचा विरोध
पण काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी मात्र या विधेयकाला संसदेत विरोध केला आहे. विरोध करताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर म्हणाले, आधार क्रमांक हा केवळ रहिवासी पुरावा म्हणून वापरलं जातं. हा क्रमांक नागरिकत्वाचा पुरावा नाही. पण तरीही तुम्ही जर मतदारांकडे आधार क्रमांक मागणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला केवळ रहिवासी असल्याचा कागदोपत्री पुरावा मिळेल नागरिकत्वाचा पुरावा मिळणार नाही. यामुळं नागरिक नसलेल्या व्यक्तीलाही मत देण्याचा धोका आहे