निवडणूक कर्मचारी नियोजित केंद्रावर रवाना

| म्हसळा | वार्ताहर |

गेले काही दिवस आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सत्ताधारी व विरोधकांनी सोडली नाही. प्रचार शिगेला पोहोचला होता. ऐन उन्हाळ्यात निवडणुकांमुळे जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले होते. लोकसभेसाठी मंगळवारी (दि.7) रायगडसाठी मतदान होत आहे.

या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात मतदान शांततेत पार पडावे यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त पोलीस अधिकारी त्यामध्ये पोलीस कर्मचारी, होमगार्ड, आर.पी.सी तैनात केले असल्याचे उपविभागीयअधिकारी महेश पाटिल यांनी सांगितले. रायगड मतदारसंघात16 लाख 68 हजार 372 मतदार आहेत. यामध्ये पुरुष 8 लाख 20 हजार 605 आणि महिला 8 लाख 47 हजार 763 आणि तृतीयपंथी 4 आहेत. तर जिल्ह्यात 2 हजार 185 मतदान केंद्र आहेत. पुरेसा पोलीस बंदोबस्त आराखड्यानुसार त्यांची विविध ठिकाणी तैनाती केली गेली असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विवेक मुगळीकर यांनी सांगितले. मतदार संघात नियुक्त क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या वाहनांवर बिनतारी संदेश यंत्रणा बसविण्यात आली आहे.

संवेदनशील मतदान केंद श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील 1 मतदान केंद्र ही क्रिटीकल पोलींग स्टेशन म्हणून निश्चित करण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त एकही संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही. सदर क्रिटीकल पोलींग स्टेशनमध्ये अतिरीक्त पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला आहे.

Exit mobile version