Election update: चंद्रपूर जिल्ह्यात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

। चंद्रपुर । प्रतिनिधी ।
पोंभुर्णा
मध्ये एकूण जागा 17 जागांसाठी लढत होत असून या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत आहेत. यामध्ये भाजप 17, काँग्रेस 17, शिवसेना 16 आणि राष्ट्रवादी 15 जागा लढवत आहे. या निवडणूकित भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

गोंडपिंपरीमध्ये एकूण जागा 17 असून या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत आहेत. भाजप 17, काँग्रेस17, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 13 जागा लढवत आहे.

कोरपनामध्ये एकूण जागा 17 असून या ठिकाणी काँग्रेसने सर्व 17 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत तर दुसरीकडे भाजप, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना आणि शिवसेना यांची छुपी युती आहे. या सर्व पक्षांनी काँग्रेस विरुध्द मिळून आपले उमेदवार दिले आहे. या ठिकाणी भाजप 10, राष्ट्रवादी 2, शेतकरी संघटना 4 आणि शिवसेना 1 जागा लढवत आहे. भाजप आपल्या कमळ या चिन्हावर लढत आहे तर राष्ट्रवादी, शेतकरी संघटना आणि शिवसेना हे टेबल या चिन्हावर लढत आहे.

जिवतीमध्ये एकूण जागा 17 असून या ठिकाणी भाजप आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी यांची युती असून गोगपा 10 आणि भाजप 7 जागा लढवत आहे तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती असून काँग्रेस 9 आणि राष्ट्रवादी 8 जागा लढवत आहे. शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढत असून 10 जागी त्यांनी उमेदवार दिले आहेत.

सिंदेवाहीमध्ये एकूण जागा 17 असून या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत असून भाजप 17, काँग्रेस 17, शिवसेना 6 आणि राष्ट्रवादी 16 जागा लढवत आहे. या निवडणूकित पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सावलीमध्ये एकूण जागा 17 असून या ठिकाणी सर्व पक्ष स्वतंत्र लढत आहेत. भाजप 17, काँग्रेस 17, शिवसेना 8 आणि राष्ट्रवादी 8 जागा लढवत आहे.

Exit mobile version