रसायनीत निवडणुका चुरशीच्या अपेक्षित

| रसायनी | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद व खालापूर पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले आहे. या निवडणुका रसायनी परिसरात चुरशीच्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

रिस जिल्हा परिषद ही अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. तर रिस पंचायत समिती नागरिकांचा मागास प्रवर्ग व आंबिवलीतर्फे तुंगारतन हा पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. मागील निवडणुकीत या जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेस-राष्ट्रवादी व शेकाप महायुती होती. त्यावेळी वासांबे पंचायती समिती शेकापक्षाला, वासांबे जिल्हा परिषद् राष्ट्रवादीला तर रिस पंचायत समिती कॉग्रेसला देण्यात आली होती.

परंतु रिस जिल्हा परिषद मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने तीन वेळा निवडून आलेल्या उमाताई मुंढे यांना यावेळी निवडणूक रिंगणात उतरता येणार नाही. तसेच त्यांचे पती यांनाही लढता येणार नाही. गेली पाच वर्षे या पंचायत समितीच्या निवडणुका मतदार संघ विविध विकासकामांनी चुरशीच्या होणार आहेत.यात रिस जिल्हा परिषद व रिस आणि आंबिवली तर्फे तुंगारतन पंचायत समितीच्या निवडणुका होणार चुरशीच्या यात मात्र तीळमात्र शंका नाही. महायुतीतर्फे जिल्हा परिषद व राजकीय गणिते अवलंबून आहेत. जर महाविकास आघाडी झाली नाही तर कोणकोणाशी युती जिल्हा परिषद व पंचायत समिती करेल याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे चित्र आहे.

Exit mobile version