जिल्ह्यात 20 ग्रामपंचायतींच्या निवडणूका

दि. 21 पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुुरुवात

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 21 ते 27 सप्टेंबर उमेदवारी अर्ज स्विकारण्यात सुरुवात करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील 20 ग्रमापंचायतींमध्ये अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1. येथील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

अलिबाग तालुक्यातील वेश्‍वी, नवेदर नवगाव, कोप्रोली, कर्जत तालुक्यातील पोटल, पाली तर्फे कथल खलाटी, खालापूर तालुक्यातील चौक, आसरे, लोधीवली, तूपगाव, पनवेल तालुक्यातील खेरणे, पेण तालुक्यातील कोपर, पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खोडा, तुर्भे खुर्द, तुर्भे बुद्रुक, वझरवाडी, महाड तालुक्यातील खरवली, माणगाव तालुक्यातील देगाव, पन्हळघर बुद्रुक, पन्हळघर खुर्द तसेच श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव या ग्रामपंचायतीं मध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे.

संबंधित ग्रामपंचायत हद्दीत आचारसंहिता लागू झाली आहे. यासाठी 21 ते 27 सप्टेंबर अर्ज भरणे, छाननी 28 सप्टेंबर, माघार 30 सप्टेंबर तर मतदान 13 ऑक्टोबर रोजी होऊन मतमोजणी 14 ऑक्टोबरला होणार आहे.

Exit mobile version