आक्षी समुद्रकिनारी निवारा शेडची विद्युत रोषणाई

| अलिबाग | शहर प्रतिनिधी |

तालुक्यातील आक्षी ग्रामपंचायत पर्यटनवाढीसाठी व त्यामुळे स्थानिकांना मिळणारा रोजगार यावर जास्त भर देत आहे. आक्षी समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ वाढताना दिसत आहे. अशातच समुद्रकिनारी पर्यटकांसाठी असलेल्या निवारा शेड खूप दिवस अंधारात होत्या. यामुळे रात्रीच्या वेळी पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. यासाठी ग्रामपंचायतीने समुद्रकिनारी असलेल्या निवारा शेडची स्वच्छता, रंगकाम तसेच विद्युत रोषणाई केली. यामुळे पर्यटकांना रात्रीच्या वेळी समुद्रकिनारी फेरफटका मारता येत आहे. यामुळे पर्यटक अधिकाधिक आक्षी समुद्रकिनारी आकर्षित होत आहेत. याचा फायदा स्थानिकांच्या रोजगाराला होत आहे.

याआधीसुद्धा ग्रामपंचायतीने आक्षी समुद्रकिनारा सुशोभीकरण केलेले आहे आणि आताही पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य ती काळजी घेत आहे. आता 31 डिसेंबरपर्यंत अजून पर्यटकांची वर्दळ वाढेल आणि त्यांची गैरसोय नको म्हणून येथील निवारा शेडचे रंगकाम आणि विद्युत रोषणाई केलेली आहे.

विनायक पाटील,
सदस्य, ग्रामपंचायत आक्षी
Exit mobile version