। कल्याण । वार्ताहर ।
ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु राहणार आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडलांतर्गत सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी सुरु राहतील. उपलब्ध सुविधेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी आपल्या चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांनी केले आहे. सुट्टीच्या दिवशीही ही मोहीम सुरू राहणार असून संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीचा त्वरित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्रासह महावितरणचे मोबाईल अॅप संकेतस्थळ तसेच विविध पेमेंट वॉलेटचा उपयोग करून घरबसल्या विजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधाही ग्राहकांना उपलब्ध आहे. ग्राहकांनी अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.