। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत चारफाट्यावर परिसरात रोषणाई करणारा विजेचा हायमास्ट स्ट्रीट लाईट दिवस बंद आहे. त्यामुळे या भागात चालत जाणार्या स्थानिकांची गैरसोय होत असून परिसराला वेगळे रूप देणारे हायमास्ट बंद पडल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
कर्जतचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्या कर्जत चारफाटा येथे कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून स्ट्रीट लाईट लावण्यात आलेली होती. मात्र वाढते नागरीकरणा गर्दीमुळे येथील परिसर दिव्यांच्या उजेडात खळाळून उठाव यासाठी हालिवली ग्रामपंचायतने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून तेथे विजेचा हायमास्ट बसवून घेतला. एम एस आर डी सी च्या मदतीने सप्टेंबर 2021 रोजी ही स्ट्रीट लाईट लावून पेथील परिसर उजळून टाकला होता. मात्र या हायमास स्ट्रीट लाईटचे विजेचे देयक कोणी भरायचे हा मुद्दा कळीचा बनला आणि त्यामुळे गेल्या महिनाभरापासून ही प्रवेशद्वाराची लाईट बंद असल्याने स्थानिकांना अंधारातुन मार्ग काढावा लागत असल्याने गैरसोय झाली होती.हायमास्ट बंद पडल्याने येथील सीसीटीव्ही कॅमेराचे चित्रीकरण होताना अडचणी नसल्याने ताबडतोब पावर मार्ग काढण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
परिसरात अंधार असल्याने रात्री अपरात्री पाच चाफाट्यावरून कुणी चालत.अथवा कुणी आपल्या दोनचाकी वाहनावरून प्रवास करतात. रात्रीच्या वेळेस चारफाटा प्रकाशमान झाल्याने जाता येताना कुणासारखी परिस्थिती आता रहाणार नाही, त्यामुळे येथील ग्रामस्थ, स्थानिक व्यवसायिक खूप आनंदीत झाले होते तसेच पादचारी यांचयासाठी देखील सोय आणि रात्रीच्या वेळी वाहनधारकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी पर्यटकांना आणि तालुक्यातील बहुसंख्य गाये या परिसरात असल्याने तसेच रेल्वे गेट परिसर गाव येथील नागरिक, ग्रामस्थ बाजारहाट रेल्वेच्या प्रवासासाठी नोकरी कामासाठी येणारे जाणारे यांच्यासाठी हा हायमास्ट महत्वाचा होता. आता हे स्ट्रीट लाईट बंद असताना याचे येणारे लाईट बिल कोण भरणार हालीवली ग्रामपंचायत की कर्जत नगर परिषद यात ही लाईट बंद झाल्याचे बोलले जात आहे. मात्र हायमास्ट सुरु व्हावा आणि परिसर उजळून निघावा अशी अपेक्षा स्थानिकांची आहे.