महावितरणकडून वाशी विभागात सव्वा कोटींची वीज चोरी उघड

| भांडूप | प्रतिनिधी |
महावितरण भांडूप परिमंडलात वीजचोरी पकडण्याची मोहीम सतत सुरु असते. वाशी मंडळातील अधीक्षक अभियंता राजाराम माने, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता श्री. शामकांत बोरसे व त्यांच्या चमू ने माहे एप्रिल 2022 पासून ते आता पर्यंत वाशी विभागात 1 कोटी 17 लाखाची वीजचोरी उघडकीस आणली आहे. याशिवाय, अनधिकृतपणे विजेचा वापर करून 51 लाख 70 हजार रुपयांचा महावितरणचा नुकसान झाला आहे.

महावितरण भांडूप परिमंडलात वीज चोरी पकडण्याची मोहीम सतत चालू असते. एप्रिल 2022 ते आतापर्यंत महावितरणच्या वाशी मंडळातील ऐरोली, कोपरखैरणे व वाशी येथील ग्राहकांच्या मीटरची तपासणी करण्यात आली. सदर तपासणीत, विविध ठिकाणी वीजचोरी तसेच विजेचा अनधिकृत वापर होत असल्याचे दिसून आले. विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 नुसार 335 प्रकरणात 1 कोटी 17 लाखाची वीजचोरी पकडण्यात आली आहे. या याशिवाय, विद्युत कायदा 2003 च्या कलम 126 नुसार 72 प्रकरणात 51 लाख 70 हजार रुपयांचा अनधिकृतपणे विजेचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. मुख्य अभियंता भांडूप परिमंडल सुनील काकडे यांनी वीजचोरी करणार्‍या ग्राहकांना आवाहन केले की येत्या काळात सदरची मोहीम अती तीव्रतेने राबविण्यात येणार आहे म्हणून कोणीही वीज चोरी करून विद्युत कायद्याचे उल्लंघन करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल

Exit mobile version