एलेना, बार्बोरा उपांत्य फेरीत

। लंडन । वृत्तसंस्था ।

चौथी मानांकित एलेना रायबकीना व 31वी मानांकित बार्बोरा क्रेझीकोव्हा यांनी विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅम महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. कझाकस्तानच्या रायबकीनाने एलिना स्वितोलिना हिचे आव्हान परतवून लावले, तर झेक प्रजासत्ताकच्या बार्बोराने येलेना ओस्तापेंकोवर मात केली आहे.

एलेना रायबकीनाने एलिना स्वितोलिनावर 6-3, 6-2 असा सरळ दोन सेटमध्ये विजय साकारला. तिने एक तास व एक मिनिटात प्रतिस्पर्ध्यावर मात केली. रायबकीना हिने सात बिनतोड सर्व्हिस केल्या. स्वितोलिना हिला एकच बिनतोड सर्व्हिस करता आली. रायबकीना हिच्याकडून एकच दुहेरी चूक घडली. स्वितोलिना हिच्याकडून चार दुहेरी चुका झाल्या.

बार्बोरा क्रेझीकोव्हाने येलेना ओस्तापेंको हिचे कडवे आव्हान 6-4, 7-6 असे मोडून काढले. क्रेझीकोव्हा हिने एक तास व 40 मिनिटांत विजय साकारला. दोन्ही सेटमध्ये या लढतीत कडवा संघर्ष पाहायला मिळाला. क्रेझीकोव्हा हिने मात्र दबावाखाली आपला खेळ उंचावला आणि दोन्ही सेटमध्ये यश मिळवले. माजी ग्रँडस्लॅम विजेत्याएलेना रायबकीना व बार्बोरा क्रेझीकोव्हा या दोन्ही महिला टेनिसपटूंनी विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली आहे. या दोघींनी याआधी ग्रँडस्लॅम विजेता होण्याचा मान संपादन केला आहे.

Exit mobile version