पहिल्या टप्प्यात अनेक प्रभागात मतदानाच्या टक्क्यात वाढ
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीचे मतदान गुरुवारी (दि.15) सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरू झाले. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत आठ टक्के मतदान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात 42 हजार 229 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 16 हजार 903 महिला आणि 25 हजार 326 पुरुष मतदारांचा समावेश आहे. सुरुवातीपासूनच मतदारांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुण मतदार स्वयंस्फुर्तीने मतदानासाठी बाहेर पडले. दुसऱ्या टप्प्यात साडेअकरा वाजेपर्यंत साडेअठरा टक्के मतदान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
पनवेल महा नगरपालिकेच्या 20 प्रभागांमध्ये एकूण 5 लाख 55,478 मतदार आहेत. यामध्ये महिला मतदार 2 लाख 59 हजार 685 व पुरुष मतदार 2 लाख 94 हजार 821 तर इतर 72 मतदारांचा समावेश आहे. सकाळच्या पहिल्या टप्प्यात एकूण 42,229 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यात 16,903 महिला आणि 25,326 पुरुष मतदारांचा समावेश आहे. प्रभागनिहायनुसार, क्रमांक 2 मध्ये 13 टक्के, प्रभाग क्रमांक 1 मध्ये 12 टक्के तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये 10 टक्के मतदान झाले. काही प्रभागांमध्ये सकाळच्या वेळेत मतदानाचा टक्का कमी होता. मतदान प्रक्रीया शांततेत सुरु झाली. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारनंतर आणि सायंकाळच्या सत्रात मतदानाचा वेग वाढेल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात साडेअकरा वाजेपर्यंत टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली आहे
