प्रदीप साखर संघ ठरला उपविजेता
। आक्षी । प्रतिनिधी ।
जय हनुमान क्रीडा मंडळ नागावच्या वतीने शनिवारी (दि.4) सर्कल बॉक्स नाईट अंडरआर्म टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फायटर शहापूर हा संघ विजयी झाला आहे. नागाव हायस्कूल मैदानावर खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत एकूण 26 संघांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, या स्पर्धेचा शुभारंभ रात्री दहा वाजता सरपंच निखिल मयेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. दोन षटकांच्या अंतिम सामन्यात इलेव्हन फायटर शहापूर हा संघ विजेता ठरला, तर प्रदीप साखर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तसेच अष्टविनायक रामवाडी पेण आणि मंगलमूर्ती साखर या संघांना तिसर्या व चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेदरम्यान राजकीय पक्षांच्या नेत्यांसह विविध मान्यवरांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या. स्पर्धेतील विजेत्या संघाला आकर्षक चषक व रोख रक्कम 10,000/- आणि उपविजेत्या संघाला आकर्षक चषक व रोख 7000/-, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाला प्रत्येकी 4000/- रोख रक्कम आणि चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच उकृष्ट फलंदाज स्वप्नील पाटील, उत्कृष्ट गोलंदाज अतिश पाटील यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.