| इंदूर | वृत्तसंस्था |
इंदूरच्या स्नेह नगरमध्ये एका विहीरीवरील छत कोसळून त्या विहिरीतून अकरा लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. इंदूरच्या ठाणे जुनी येथील पटेल नगर येथील शिवमंदिरातील विहिरीचे छत कोसळल्याने अनेक लोक विहिरीत पडले होते. ही घटना घडली त्यावेळी मंदिरात कन्याभोज सुरू होता. दुर्घटनेनंतरही पायरीच्या आजूबाजूची जमीन सातत्याने खचत होती. रामनवमी असल्याने मंदिरात सकाळपासूनच गर्दी होती. दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.