| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 जागांसाठी शनिवारी (दि.7) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानासाठी सुरुवात झाली. जिल्ह्यातील अनेक भागात मतदारांनी स्वयंस्फुर्तीने घरातून बाहेर पडून मतदानाला सुरुवात केली. एक वेगळा उत्साह या निमित्ताने पहावयास मिळाला. जिल्ह्यात सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत दोन तासात 11.5 टक्के मतदान झाले आहे. एक लाख 87 हजार 844 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात एक लाख आठ हजार 646 पुरुष व 79 हजार 198 महिला मतदारांचा समावेश आहे. महिला मतदारांपेक्षा पुरुष मतदारांची संख्या मतदान करण्यामध्ये अधिक असल्याचे आकडेवारीनुसार दिसून आले.
जिल्ह्यात पनवेल तालुक्यात 13 टक्के, कर्जतमध्ये 11.24 टक्के, खालापूरमध्ये 11.1 टक्के, सुधागडमध्ये 10.49 टक्के, पेणमध्ये 11.39 टक्के, उरणमध्ये 10.4 टक्के, अलिबागमध्ये 12.43 टक्के, मुरूडमध्ये 10.57 टक्के, रोहामध्ये 10.37 टक्के, तळामध्ये 11.24 टक्के, माणगावमध्ये 7.68 टक्के, म्हसळामध्ये 9.9 टक्के, श्रीवर्धनमध्ये 8.87 टक्के आणि महाडमध्ये 11.02 टक्के, पोलादपूरमध्ये 9.63 टक्के मतदान झाले. या दोन तासात पनवेल, अलिबाग, पेण, तळा, मूरूड, रोहा, खालापूर, महाडमध्ये दहा टक्केपेक्षा अधिक मतदान झाले. तर उर्वरित तालुक्यात दहा टक्केपेक्षा कमी मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.







