16 ऑगस्टपासून आकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु

। मुंबई । वृत्तसंस्था ।
16 ऑगस्टपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक अमरावती, नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेळ केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येतील. सीईटी परीक्षेपुर्वी अर्जाचा पहिला भाग आणि परीक्षेनंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पुर्व तयारी आता सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सरावाठी 13 ऑगस्टपासून तात्पुर्ती नोंदणी करता येणार आहे. सीईटी परीक्षेपुर्वी अर्जाचा पहिला भागात विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती त्यासोबत शुल्क भरुन अर्ज लॉक करायचा आहे. सीईटी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सीईटीचे गुण आणि पसंती क्रमांक यासाठी अर्जाचा दुसरा भाग भरायचा आहे. त्याच वेळापत्रक काही दिवसांमध्ये संकेतस्थलावर जाहीक करण्यात येईल.राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकालात 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची संख्या पाहता सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज भरला नसल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक 2 लाख 55 हजार 643 अर्ज मुंबई विभागातून भरले गेले आहेत, तर सर्वात कमी 20 हजार 566 अर्ज कोकण विभागातून भरले गेले आहेत.

Exit mobile version