कर्जतमध्ये मराठा समाजाचा एल्गार

| कर्जत | वार्ताहर |

जालन्यामध्ये आंदोलनासाठी बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर बेछूट लाठीमार करण्यात आलेल्या निषेधार्थ व मराठा आरक्षण मिळण्यासाठी आपले प्राण पणास लावणार्‍या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कर्जत लालुक्यातील सकल मराठा समाजाने सोमवार 11 सप्टेबर रोजी बंदची हाक दिली होती. त्याला साद देत कर्जतकरांनी कडकडीत बंद पाळला. तसेच मराठा समाज बांधवांनी शहरातून मोर्चा काढून केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी मराठा तसेच दलित बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाने कर्जतमध्ये सरकार विरुद्ध एल्गार पुकारला.

सकाळी साडे नऊच्या सुमारास शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका जवळ मराठा समाजाचे बांधव एकत्र जमले होते. याप्रसंगी जितेंद्र पाटील, दीपक मोरे, किरण ठाकरे, प्रदीप ठाकरे, प्रमिला बोराडे, पूजा सुर्वे, भारती कांबळे, प्रकाश पालकर, शंकर थोरवे, मनोहर थोरवे, राजेश लाड, सोमनाथ ठोंबरे, संकेत भासे, हेमंत ठाणगे, मधुरा चंदन, संतोष पाटील, अनंत निलधे, अशोक शिंदे, स्वप्नील पालकर, अ‍ॅड. राजेंद्र निगुडकर, शाहीर गणेश ताम्हाणे, शरद हजारे, अनिल भोसले, अरुण देशमुख, प्रसाद थोरवे, सोमनाथ पालकर, काशिनाथ शिंदे, रत्नाकर बडेकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version