नांदगाव विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव येथे लोकमान्य टिळक यांच्या 102 व्या पुण्यतिथी निमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला होता. या स्पर्धा तीन गटात पार पडल्या. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचे जीवन परिचय, स्वातंत्र्यसाठीचा लढा,कार्य आणि कर्तृत्व आपल्या भाषणांतून व्यक्त केले.

या स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून शिंदे एस ए, ठकोरे एस एस, माळी आर एम यांनी भूमिका पार पाडली. प्रा ठकोरे यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळकांच्या जीवनातील घडलेले प्रसंग,त्यांचा जीवनपट मोजक्या शब्दात विद्यार्थ्यांसमोर मांडला. यावेळी प्राचार्य संभाजी ढोपे तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते. या स्पर्धेचे सूत्रसंचालन नागेश सायगावकर तर आभार सूर्यवंशी पी. के. यांनी केले.

Exit mobile version