। पनवेल । प्रतिनिधी ।
नवीन पनवेल येथील एका ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील 54 हजार 880 रुपयांच्या सिमेंटच्या 120 पोत्यांचा अपहार केल्याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमाम हुसेन शेख असे या चालकाचे नाव आहे. इमाम याने कळंबोली येथील कंपनीमधून सिमेंटच्या 240 गोणी बंगाल पश्चिम येथे घेऊन जाण्यासाठी भरल्या होत्या. मात्र, त्याने 120 सिमेंटच्या गोणी खाली केल्याचे चलन पाठवले. त्यानंतर त्याने कळंबोली येथील पार्किंगमध्ये ट्रक पार्क करून चावी कंपनीच्या ऑफिसमध्ये जमा करून निघून गेला. या वेळी ट्रकची तपासण केली असता, त्यात उर्वरीत सिमेंटच्या 120 गोणी सापडून आल्या नाहीत. या प्रकरणी इमार शेख याच्याकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी कळंबोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






