कामोठ्यात लाखो रुपयांचा अपहार

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

1 लाख 93 हजार रुपयांची बिले डिलीट करून ते पैसे स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन दुकानात अपहार करून फसवणूक केल्या प्रकरणी संदीप सरोज याच्याविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामोठे प्रभाग क्रमांक 10 येथे हरीश वैध यांचे फूड बास्केट नावाचे शॉप येथे आहे. त्यांच्या दुकानात संदीप सरोज हा काम करतो. त्यांनी युजर आयडी चालू केले. यावेळी युजर आयडीचा वापर दुसऱ्या कोणीतरी केला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच, युजर आयडी आणि पासवर्डचा वापर करून बिल डिलीट केले असल्याचे दिसून आले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता संदीप सरोज हा कॅश काऊंटरवर उभा होता आणि त्याने दुकानातील बिलाचे पैसे कॅशमध्ये घेतलेले दिसत होते. आणि ते पुडित बांधून खिशात ठेवत असताना दिसून आले. त्याने एकूण 1 लाख 93 हजार 80 रुपयांची बिले त्याने डिलीट मारली आहेत.

Exit mobile version