| रुद्रप्रयाग | वृत्तसंस्था |
शुक्रवारी (दि.24) सकाळी केदारनाथ धाममध्ये हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील वैमानिक आणि सहा प्रवासी सुखरूप आहेत. हे प्रवासी सिरसी हेलिपॅडवरून केदारनाथ धामच्या दर्शनासाठी जात असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हेलिपॅडवर उतरण्यापूर्वी ते हवेत गरगरले. यानंतर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
डीजीसीएने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताच्यावेळी हेलिपॅडवर काही प्रवासी आणि कंपनीचे कर्मचारी होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, हे हेलिकॉप्टर क्रेटन एव्हिएशन कंपनीचे आहे. हेलिपॅडच्या 100 मीटर आधी ते हवेत गिरक्या घेऊ लागले. कॅप्टन कल्पेश हे हेलिकॉप्टर उडवत होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकार्यांनी घटनास्थळ गाठून प्रवाशांना मदत करत मंदिरात नेले. शिवाजी, उलुबंकट चलम, महेश्वरी, सुंदरा राज, सुमथी, मयूर बागवानी हे तमिळनाडूतील सहा भाविक हेलिकॉप्टरमध्ये होते.