। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
वार्षिक अर्थसंकल्पाची घोषणा आज होणार असून देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्टार्टअपसंदर्भातील माहीती जाहीर केली आहे. भारतात 2016 पासून साठ हजार नवे स्टार्टअप सुरु झाले आहेत आणि यापासून जवळपास 6 लाख नवीन रोजगाराची निर्मिती झाली आहे असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी संसदेत बोलताना म्हटले आहे.
मी त्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांना नमन करतो ज्यांनी त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य दिले आणि भारताला हक्क मिळवून देण्यासाठी मदत केली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात भारताच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देणार्या व्यक्तिमत्त्वांचेही मी आदरपूर्वक स्मरण करतो, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. कोरोनाने अनेक लोकांना आपल्यापासून हिरावून घेतले. या काळात काम करणार्या सर्व फ्रंटलाईन वर्कर आणि नागरिकांचे राष्ट्रपतींनी आभार मानले.
पद्म पुरस्कारात देशभरातील विविध भागातील विविध क्षेत्रातील लोकांना पुरस्कार दिले गेले, हे सरकार सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रपतींनी सांगतले. कोरोनाच्या काळात अनेक देशात अन्नधान्याची कमी पाहायला मिळाले. परंतु 80 करोड लाभार्थ्यांना फायदा मिळाला. तसेच डिजिटल इंडियातही सरकारने प्रभावी काम केले. कोरोनातही पेय जल 6 करोड लोकांना फायदा झाला तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत लोकांना फायदा झाला. कोणीही उपाशीपोटी घरी परतणार नाही याची खात्री करण्यासाठी, माझे सरकार दर महिन्याला पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा भाग म्हणून गरिबांना मोफत रेशनचे वाटप करते. आज भारत जगातील सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम चालवत आहे; ती मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.