प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरीत घ्या !

शेतकरी संघटनेचे बीपीसीएल व्यवस्थापनास निवेदन

| रसायनी | वार्ताहर |

रसायनीत बीपीसीएल प्लांटचे काम लवकरच पूर्ण होत आहे. तरी, स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकरीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी रसायनी प्रकल्पग्रस्त शेतकरी विकास सामाजिक संस्थेच्यावतीने करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीपीसीएलच्या एलपीजी प्लांट दापिवली येथे कंपनीचे कार्यकारी संचालक व एलपीजी प्रमुख एस. मुखर्जी यांना भेटून स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत घेण्यासाठी निवेदन देऊन आग्रही भूमिका मांडली. ही चर्चा सर्व शेतकरी बांधवांसमोर करण्यात आली.

याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष रमेश पाटील, महासचिव काशिनाथ कांबळे, सचिव समीर खाने, सहखजिनदार सुरेश गाताडे, सदस्य दिपक बरवी, तेजस भोईर, पनवेल पंचायत समिती सदस्य जगदीश पवार, सदाशिव खाने (पाटील), रघुनाथ पाटील, गणपत पाटील, नारायण पाटील, भगवान पाटील, राजेश माळी, गणू बरवी, यादव दिघे, योगेश पाटील, विकास भंडारकर, प्रमोद माळी, मधुकर महाडिक, राम खाने, हरिश्चंद म्हात्रे, विनायक भोईर, अनंत कांबळे, भिवसेन जांभळे, अरूण पाटील, निखिल गाताडे, काळुराम राऊत इत्यादी दापिवली, वावेघर, पोसरी, मोहोपाडा, चांभार्ली, तुराडे, सावळे, देवळोली, आंबिवली येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Exit mobile version