मुरुड वीज वितरण अधिका-यासह कर्मचारी संपावर

Exif_JPEG_420

वीज पुरवठा विस्कळीत होण्याची भीती
| आगरदांडा | प्रतिनिधी |

वीज वितरणाच्या खासगीकरणाला विरोध यांसह अदानी वीज कंपनीला वितरणाचा परवाना देऊ नये आदी मागण्यांसाठी मुरुड शहरातील महावितरण कार्यालया समोर अदानी हटाव देश बचाव, अदानी गो बॅक…वीज उद्योजक खाजगी करणाचा जाहीर निषेध, एकी हेच बळ, विद्युत कंपन्यात राजकीय हस्तक्षेप बंद करा अश्या प्रकारचे फलक घेऊन सर्व अधिकारी कर्मचारी संपात सहभागी झाले. परिणामी तालुक्यातील वीज यंत्रणा कोलमडून पडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

यावेळी या संपात उपकार्यकारी अधिकारी अभियंता – महादेव दातीर, कनिष्ठ अभियंता- विषाल इंगावले, सहाय्यक अभियंता – राजेश गोरले, कनिष्ठ अभियंता -प्रियंका सुर्यवंशी, कनिष्ठ अभियंता – भरत पाटील, लिपिक- धीरज पवार, वायरमन- वसंत घोसाळकर, वायरमन- राजेश वाघीरे, मयुर किल्लेकर, प्रधानतंत्रन्य- मंगेश किल्लेकर आदिंसह सर्व अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

वीज अधिका-यांसह कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे त्यांच्या कोणत्याही आर्थिक मागण्या नाहीत तर नागरिकांच्या मालकीचा वीज उद्योग टिकला पाहिजे तो भांडवलदारांना विकाता कामा नये भांडवलदार नफा कमविण्याच्या उद्येशाने वीज वितरण क्षेत्रात येत आहेत असा दावा येथील कर्मचारी यांनी केला.

वीज वितरण परवाना मिळविण्यासाठी अदानी वीज कंपनीने राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. अदानी कंपनीला वीज वितरण परवाना मिळण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मात्र, महावितरण कंपनीला चांगले उत्पन्न मिळत असलेली किंवा वीजबिल वसुलीचे प्रमाण चांगले असलेले विभाग खासगी वीज कंपनीकडे जातील आणि महावितरण कंपनी आणखी आर्थिक अडचणीत सापडून शासकीय वीजकंपन्यांचे खासगीकरण होईल, तरी अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, अशी मागणी आम्ही आमच्या आंदोलनातून करत आहोत.

Exit mobile version