उत्सवाच्या माध्यमातून बुरुड समाजाला रोजगार

पाताळगंगा | वार्ताहर |
गौरी गणपती उत्सवामध्ये ओवास साठी बांबूच्या काठी पासून बनविलेल्या सुपाची मागणी वाढत असल्यामुळेया माध्यमातून बुरुड समाजाला या सणांच्या माध्यमातून रोजगार मिळत आहे.
गौरी-गणपतीच्या सणाला  ओवसा  देण्यासाठी प्रत्येक महिला वर्ग फक्त बांबूच्या काठीपासून बनवित असलेल्या सुपांचा ओवसा देत आसल्यामूळे बाजारात मोठ्या प्रमाणात सुपे विक्रीस ठेवण्यात आले,असून प्रत्येक महिलांची खरेदी करण्यांची लगबग सुरु झाली आहे.गेले अनेक दिवस पावसाचे तांडव सुरु असल्याने बाजार पेठेत खरेदि करण्यासाठी महिलांची पावसामुळे तारांबळ उडत आहे.मात्र पावसाची क्षणभर विश्रांती ही महिला वर्गांना मोठा दिलासा देत आहे.या विचारांतून बांबूच्या काठीपासून तयार केलेली सुपे बाजार पेठेत मोठया प्रमाणात विक्री ठेवण्यात आली आहे.खरेदीसाठी मोठे उधाण आले आहे.
हिंदू संस्कृती नुसार बांबूच्या काठयाने बनविलेल्या सुपे म्हणून नवविवाहित महिला गौरी-गणपतीच्या पूजनासाठी सुपे वापरतात.त्या साठी माहेरून आपली आई आपल्या मुलीला गौरी-गणपतीच्या पूजनासाठी सुपे देतात त्यास म ओवसा म असे म्हणतात.या म ओवसा म मुळे सुपे बनविणा-यांचा धंदा या महिन्यात जोरात चालला असल्यामुळे ,मोहपाडा,चौक ,खोपोली कर्जत,आशा अनेक ठिकाणी असलेल्या बाजार पेठत मोठ्या प्रमाणात सुपाची विक्री होत आहे.वाढत्या महाघाई मुळे सुपांची किंमत वाढली असली तरी सुद्धा ओवसासाठी ही सुपे खरेदी केली जात आहे.

Exit mobile version