‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक यांना बढती

सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती

| मुंबई | प्रतिनिधी |

एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी दया नायक यांना अखेर सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर बढती मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे ही बढती त्यांना निवृत्तीच्या अवघ्या दोन दिवस आधी मिळाली आहे. 31 जुलै रोजी ते पोलीस खात्यातून सेवानिवृत्त होत आहेत.

सध्या दया नायक हे मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक धाडसी ऑपरेशन्स पार पाडले असून, मुंबईतील अंडरवर्ल्डचा दबदबा कमी करण्यात त्यांचे मोठे योगदान मानले जाते. दया नायक यांच्यावरील ही उशिरा का होईना मिळालेली बढती त्यांच्या सेवा कार्याची मान्यता मानली जात आहे. मात्र, निवृत्ती अगदी दारात असताना ही बढती दिल्याने पोलीस खात्यात आणि अधिकाऱ्यांच्या वर्तुळात या निर्णयावर विविध चर्चा रंगल्या आहेत.

Exit mobile version