| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषद मुख्याधिकारी समीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगरपरिषदेच्या अतिक्रमण पथकाने उरण बाजार पेठेतील रस्त्याच्या दोन्ही बाजूस फळ विक्रेत्यांनी व भाजीवाल्यांनी थाटलेल्या विक्रेत्यांवर उरण नगरपरिषदेने कारवाई करून त्यांच्या गाड्या हटविण्यात आल्या.
उरण नगर परिषदेच्या जागेवर रस्त्याच्या दोन्ही बाजूस, फळ विक्रेते, व भाजीवाल्यांनी हातगाड्या लावल्या होत्या. या हातगाड्या उरण नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागा मार्फत शुक्रवारी शुक्रवार (दि. 2) रोजी हलविण्यात आल्या.
उरण नगरपरिषदेच्या हद्दीतील उरण बाजार पेठेत नेहमीच वर्दळ असल्यामुळे वाहतुक कोंडी होत असते. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. वाहतुकीला अडथळा होवू नये. नागरिकांना होणारा त्रास दूर व्हावा, या उद्देश्याने उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहरात शुक्रवारी (दि. 2 ) रोजी अतिक्रमण विभागाने उरण शहरातील बाजारपेठेच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस लावण्यात आलेल्या फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या हटविण्यात आल्या. त्यामुळे सध्यातरी रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी झाली आहे. यावेळी उरण नगर परिषदेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी, कर्मचारी , कामगार सर्वांनी या मोहिमेत सहभागी होत ही मोहीम यशस्वी केली.
उरण शहरातील बाजार पेठेच्या रस्त्यालगत ज्या दुकानदारांची दुकाने आहेत. अशा दुकानदारांवर कारवाई केली जाईल. उरण नगरपरिषदेच्या जागेवर केलेली अतिक्रमणे वेळोवेळी हटविण्यात येतील. त्यासाठी आमची अतिक्रमण विभागाची भरारी पथके काम करणार आहेत. विशेषता बाजार पेठेतील रस्त्यावर दुकानदारांची होत असलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी आमची पथके काम करतील.
समीर जाधव
मुख्याधिकारी उरण नगरपरिषद