इंग्लंडची सेमी फायनलमध्ये धडक

MANCHESTER, ENGLAND - JULY 20: Moeen Ali and Eoin Morgan of England celebrate after the dismissal of Fakhar Zaman of Pakistan during the 3rd Vitality T20 International between England and Pakistan at Emirates Old Trafford on July 20, 2021 in Manchester, England. (Photo by Philip Brown/Popperfoto/Popperfoto via Getty Images)

श्रीलंकेवर 26 धावांनी मात
जोस बटलरचे झंझावाती शतक

। शारजा । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्‍वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. इंग्लंडने स्पर्धेत सलग चौथा विजय नोंदवला. शारजाहच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेचा 26 धावांनी पराभव केला.
प्रथम खेळताना इंग्लंडने 4 गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या. जोस बटलरने नाबाद 101 धावांची खेळी केली. त्याचे हे टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले शतक ठरले. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 10 गड्यांच्या मोबदल्यात 137 धावाच करू शकला. बटलरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यापूर्वी इंग्लंडने ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि वेस्ट इंडिजचाही पराभव केला होता. तीन पराभवांसह श्रीलंका संघ अंतिम-चारच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. 2014 मध्ये श्रीलंकेने टी-20 विश्‍वचषक जिंकला होता. त्याचबरोबर इंग्लंड संघाने 2010 मध्ये विजेतेपद पटकावले आहे.
दरम्यान, इंग्लंडच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांनी 24 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. चरित असलांकाने 24 धावा केल्या. भानुका राजपक्षे 26 आणि अविष्का फर्नांडो 13 धावा करून बाद झाले. अशाप्रकारे संघाने 76 धावांत 5 विकेट गमावल्या. अखेरच्या 5 षटकात संघाला 51 धावा करायच्या होत्या. लेगस्पिनर आदिल रशीदने दोन बळी घेत संघाला मोठे यश मिळवून दिले.

Exit mobile version