इंग्लंड क्रिकेटपटूच्या घरावर दोन वेळा हल्ला

। मुंबई । वृत्तसंस्था ।

इंग्लंडचा क्रिकेटपटू आणि हॅम्पशायरचा कर्णधार जेम्स व्हिन्सच्या कुटुंबाला कोणीतरी वेठीस धरले आहे. मागील चार महिन्यांपासून त्याच्या आयुष्यातील सर्व सुख-शांती हरवली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की जेम्सलसा त्याचे राहते शहर साउथॅम्प्टन सोडावे लागले.

इंग्लंडसाठी 13 कसोटी 25 एकदिवसीय आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या जेम्स व्हिन्सच्या मालमत्तेवर सतत आक्रमण होत आहे. पहिला हल्ला 15 एप्रिल 2024 रोजी झाला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अज्ञात हल्लेखोर विन्सच्या घराच्या आवारात घुसून वाहने आणि घरावर हल्ला करताना दिसत आहेत. पोलिस पोहोचेपर्यंत हल्लेखोराने सर्वकाही उद्ध्वस्त केले होते. एक कार उभी असल्याचे शेजार्‍याने पाहिले होते. घर आणि कारची दुरुस्ती करण्यासाठी विन्सला तात्पुरते घर सोडावे लागले. घरी परतल्यानंतर जेमतेम एक आठवड्यानंतर 11 मे रोजी दुसरा हल्ला झाला. पोलीस या प्रकरणी हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्या हाताला काहीच लागले नाही.

Exit mobile version