शालेय पूर्वतयारी अभियान मेळावा उत्साहात

। मुरुड । वार्ताहर ।
कोरोनामुळे गेली दोन वर्षे शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या बंद पडल्या होत्या. आता त्या चालू झाल्या असून, अंगणवाडीच्या मुलांसाठी शालेय पूर्वतयारी मेळावा अभियान कार्यक्रम राजिप शाळा गोपाळवट येथे पार पडला.
मुलांना आनंद मिळावा, तसेच शिक्षणाविषयी मार्गदर्शन मिळावे याकरिता या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्यांनी शिक्षणाचा महत्त्व कळून दिले अशा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला.
गोपाळवट शाळेचे मुख्याध्यापक राठोड, शिक्षक कोळी यांनी शालेय मुलांना शिक्षणाविषयी मार्गदर्शन करून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष महादेव शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सुहासिनी डिके, शालेय व्यवस्थापन कमिटीचे सदस्य गोविंद हिरवे, योगेश आंबेकर, सोनाली हिरवे, अंगणवाडी सेविका रंजना दुसार उपस्थित होत्या.

Exit mobile version